खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड (Selection of Khelo India (Field) Training Center players for State level tournament)

Vidyanshnewslive
By -
0
खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड (Selection of Khelo India (Field) Training Center players for State level tournament)


चंद्रपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत नागपूर विभागस्तरीय 14, 17 व 19 वर्षाआतील मुले /मुलींच्या शालेय मैदानी क्रीडा जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यामधुन क्रिष्णा रोहणे, सोहम मोरे, अंकित यादव , दर्शन निवाडे, आरुष चव्हाण, युकांत उके, श्रेया ईथापे, किंजल भगत, अंकिता चव्हाण या खेळाडुंनी खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कष्ट प्रदर्शन करीत राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला गवसनी घातली. त्यांच्या या यशासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, मनोज पंधराम, नंदु अवारे, मोरेश्वर गायकवाड, संदिप उईके, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे तसेच ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, सचिव सुरेश अडपेवार व इतर पदाधिका-यांनी खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडुंना भविष्यासाठी व राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)