काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, वरोरा येथून प्रविण काकडे, चंद्रपूरातून प्रविण पडवेकर तर बल्लारपूर येथून संतोषसिंग रावत यांना उमेदवारी (Congress announced the third list of 14 candidates, Pravin Kakade from Warora, Pravin Padvekar from Chandrapur and Santosh Singh Rawat from Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने आज 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात जाहीर केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तीन उमेदवार यांची नावे जाहीर केली असून यानुसार वरोरा मतदार संघातून खा. प्रतिभाताई धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे तर चंद्रपूर या अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या मतदार संघात अनेक मातम्बर उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे जोर लावला त्यात सुधाकर अंभोरे, राजू झोडे यांच्या सह अनेक उमेदवार होते पण काँग्रेस पक्षाने प्रविण पडवेकर यांना उमेदवारी दिली आहे तर महाराष्ट्रातील महत्वाचा मतदार संघ म्हणून ओळखला जाणारा मतदार संघ म्हणून बल्लारपूर मतदार संघ ओळखला जातो येथून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्यासाठी अनेकांनी उमेदवारी मागितली त्यात डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. संजय घाटे, संदीप गिऱ्ये (उबाठा), घनश्याम मुलचंदानीयांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली पण काँग्रेस पक्षाने संतोषसिंग रावत यांना उमेदवारी दिली आहे. आता पक्षाने उमेदवारी जाहीर झाली असली तरी पक्षातर्गत बंडखोरी रोखण्यासाठी विविध राजकीय पक्षाना डोकेदुखी सोबत मोठं आव्हान ठरणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)