बाबुपेठ उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, नामकरणानंतर लोकार्पण करा; माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांची मागणी (Babupeth flyover. Give the name of Dr. Babasaheb Ambedkar, after the naming, launch; Demand of former corporator Snehal Ramteke)

Vidyanshnewslive
By -
0
बाबुपेठ उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, नामकरणानंतर लोकार्पण करा; माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांची मागणी (Babupeth flyover. Give the name of Dr. Babasaheb Ambedkar, after the naming, launch; Demand of former corporator Snehal Ramteke)


चंद्रपूर :- बाबूपेठ वासियांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. बाबूपेठ उड्डाणपूल तयार झाला. या उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांनी केली आहे. बाबूपेठ, लालपेठ, रयतवारी व बायपास मार्गावरील नागरिक अनेक वर्षे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी करीत होते. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक रेल्वेच्या उड्डाणपूला अभावी मोठा त्रास सहन करीत होते. रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली. रेल्वे विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. प्रशासनाने लोकार्पण सोहळा आयोजित करावा याला बाबूपेठ व परिसरातील नागरिकांचे या चांगल्या कार्याला निश्चितच सहकार्य राहील. चंद्रपूर बाबुपेठ येथे तयार करण्यात आलेला उड्डाणपूल. मात्र महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे. त्या घरांसाठी रस्ता उपलब्ध करून द्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. मात्र, पुलाच्या बाजुला असलेल्या सुमारे दहा ते बारा घरांतील नागरिकांचा घराबाहेर पडणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्यावतीने उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यापूर्वी या घरांतील नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)