बल्लारपूर :- रोजी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर समाजशास्त्र आणि गृह अर्थशास्त्र विभागातर्फ काल दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देण्यात आली.यावेळी वृदद्धाश्रमाच्या व्यवस्थापक यांनी प्राध्यापकांचे स्वागत केले याप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ शुभांगी भेंडे शर्मा तसेच गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. विभावरी नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग या अंतर्गत वृद्ध व्यक्तींशी हितगुज साधून विद्यार्थ्यांनी चर्चा केली.
त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून अंताक्षरी, भजन गायन, गरबा नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी काही व्यक्तींनी स्वतःच्या मन पसंतीचे गाणे गायले तर कोणी भजन केले तर कोणी देवाचे कीर्तन केले . नवीन आणि जुनी पिढी च्या या मेल मिलाप विद्यार्थी आणि वृद्ध व्यक्ती सुखाने आणि आनंदाने भारावून निघाले. वृद्ध व्यक्तींना भेटवस्तू देऊन त्यांचा निरोप घेत असताना दिवाळीला सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा वृद्धाश्रमात येण्याच आमंत्रण दिलं. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीशी संवाद साधला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या