बल्लारपूरातील क्रिसेंट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी सांस्कृतीक खंडेलवाल आणि इंद्रेश खंडेलवाल यांनी कराटेमध्ये मिळविला ब्लॅक बेल्ट (Sanskritik Khandelwal and Indresh Khandelwal, students of Crescent Public School, Ballarpur, bagged black belts in karate.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील क्रिसेंट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी सांस्कृतीक खंडेलवाल आणि इंद्रेश खंडेलवाल यांनी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. मनोज डे आणि शाळेचे क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणात त्यांनी ही कामगिरी केली. खेळ हा शाळेतील शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही कामगिरी कठोर परिश्रम आणि समर्पणाने प्रत्येक ध्येय गाठता येते याचा पुरावा आहे. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका हुमैरा खान यांनी दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव केला. इंद्रेश व सांस्कृतिका यांची कामगिरी शाळेतील क्रीडा विभाग व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या. क्रिसेंट पब्लिक स्कूलच्या वतीने इंद्रेश व सांस्कृतिका यांचा उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिले आणि भविष्यातही ते अशी कामगिरी करून शाळेचे नाव गौरव करेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)