भारतीय नवीन कायदे " या विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ एड. उज्वल निकम यांचे व्याख्यान (On "India's New Laws". Senior jurist Ed. Definition of Ujwal Nikam)

Vidyanshnewslive
By -
0
" भारतीय नवीन कायदे " या विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ एड. उज्वल निकम यांचे व्याख्यान (On "India's New Laws". Senior jurist Ed. Definition of Ujwal Nikam)


चंद्रपूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, नामवंत अधिवक्ता आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ, ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे 'भारतीय नवीन कायदे' या विषयावर 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह मध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहीती डा. मंगेश गुलवाडे यांनी आयोजित पत्रकार परीषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेला अहील्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरीक समिति चंद्रपुर चे अध्यक्ष डा. मंगेश गुलवाडे व अखिल भारतीय अधिवक्ता परीषद चंद्रपुर चे जिला महामंत्री एड. आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते. अधिवक्ता उज्वल निकम हे त्यांच्या प्रभावी भाषणशैलीतून भारतीय नवीन कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील मुद्दे स्पष्ट करतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष ऍड मुकुंद टंडन, जिल्हा महामंत्री ऍड आशिष धर्मपुरीवार यांच्या तर्फे सर्व चंद्रपूरकर नागरिक, अधिवक्ता, कायदा क्षेत्रातील विद्यार्थी, तसेच नवीन कायद्यांची माहिती जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांना या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)