नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येत्या ११ व १२ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासह धम्मदीक्षा व इतर कार्यक्रमांसाठी भारतासह विदेशातील विद्वान बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी दिली दरवर्षी दीक्षाभूमीवरील मुख्य समारंभास बौद्ध धम्माचा अभ्यास असणाऱ्या व धम्म कार्यात आपले अमूल्य आयुष्य वेचणाऱ्या भन्तेंना स्थान मिळावे या पवित्र हेतूने संपूर्ण भारतभर काम करणारे भन्ते दीक्षाभूमीवर यावेत व बौद्धांना मार्गदर्शन करावे यासाठी बौद्ध धम्मपरिषदेसह मुख्य कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमात यात भदन्त आनंद (आग्रा उत्तर प्रदेश), महाबोधी महाविहार प्रबंधन कमिटी बोधगयाचे विश्वस्त भदन्त प्रज्ञाशील, भदन्त संघरत्न मानके (पवनी, भंडारा), भन्ते ज्ञानज्योती (चंद्रपूर), भन्ते ज्ञानदीप, भदन्त प्रियदर्शी, भन्ते धम्मकाया (ओडिशा), भन्ते महापंत, भदंत सत्यशील महास्थवीर, भदंत हर्षबोधी (बोधगया), भदंत धम्मशिखर (बालाघाट), भन्ते मेत्तानंद, भदंत प्रज्ञानंद, पणयासिरीथेरो, भदंत विनय रक्षिक, भदंत चंद्रमणी, भदंत धम्म ज्योती (नालंदा), भदंत धम्मसेना, भदंत पथिक (गुजरात), भदंत मौर्य बुद्धा (तामिळनाडू) भदंत वरज्योती, भदंत बोधी पालो (कोलकाता), भदंत धम्मशरण (औरंगाबाद), भदंत संघधातू (गोंदिया), भदंत आनंद (कोल्हापूर), भदंत आयुपाल मुंबई, भदंत धम्मधर पुणे, या सर्व अतिथीगणांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सुविधेत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाईल तसेच पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी फुले आंबेडकरी विचारधारेची ग्रंथ रुपी शिदोरी अनुयायासाठी उपलब्ध राहील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या