गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्याचा तिघांवर चाकूने हल्ला, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत (An illegal liquor seller attacked three people with a knife in Gondpipari, the atmosphere calmed down after the intervention of senior officials)

Vidyanshnewslive
By -
0
गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्याचा तिघांवर चाकूने हल्ला, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत (An illegal liquor seller attacked three people with a knife in Gondpipari, the atmosphere calmed down after the intervention of senior officials)


चंद्रपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील सकमपूर गावात काल सायंकाळी एका दारूविक्रेत्याने तेथील पोलीस पाटलासह दोघांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये पोलीस पाटील जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकरी प्रचंड संतापले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीला गाडीत बसविल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला आमच्या हवाली करा, मुख्य आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. गावकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. त्यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला. अवैध दारू विक्रेत्याकडून पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पोलीस पाटलावरच चाकू हल्ला झाल्याने गावकरी संतापले आहेत. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी गोंडपिपरी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इरफान शेख, रा. राजूरा असे एका संशयीताचे नाव आहे. नागरिकांनी पोलिसांच्या वाहनाच्या टायरमधील हवा सोडली, गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे लगेच अतिरिक्त पोलिसांना बोलाविण्यात आले. यावेळी पोलिसांच्या वाहनात एक गावकरी सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे तणावात आणखी भर पडली. गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्या रात्रीपर्यंत अडवून ठेवल्या होत्या. सध्या तणावाची स्थिती असल्याने अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे रात्री 3 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला कडक शिक्षा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)