जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक, महिलांविषयक विविध योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा (Meeting of district level control committee, review of various schemes related to women by district collector)
चंद्रपूर : विविध विभागांमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणा-या योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रदीप काथोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पालिका प्रशासन विभागाच्या सहआयुक्त विद्या गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहा. आयुक्त भैयाजी येरमे, संरक्षण अधिकारी श्रीमती राठोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महिला समुपदेश केंद्र सध्यास्थितीत चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा आणि भद्रावती येथे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या केंद्राचा लाभ होण्यासाठी सदर केंद्र जिल्हाभरात असावे, यासाठी महिला व बालविकास विभागाने नियोजन करावे. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत जास्तीत जास्त महिलांना तात्काळ दिलासा मिळणे आवश्यक आहे. या अंतर्गत प्रलंबित प्रकरणांची माहिती त्वरीत द्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या. या योजनांचा घेतला आढावा महिला व बालविकास कार्यालयामार्फत राबविण्यात येणारी स्वाधारगृह योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, मनोधैर्य योजना, महिलांच्या वैयक्तिक व सामूहिक योजना, उमेदची प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उन्नयन योजना, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, सहायक आयुक्त, समाजकल्याण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय व इतर कार्यालयामार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजना.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
Post a Comment
0Comments