जिल्ह्यातील 23 ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार, 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन (Acharya Chanakya Skill Development Center will be established at 23 places in the district, online inauguration will be done by the Prime Minister on September 20)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्ह्यातील 23 ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार, 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन (Acharya Chanakya Skill Development Center will be established at 23 places in the district, online inauguration will be done by the Prime Minister on September 20)


चंद्रपूर : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन केली जात आहे. जिल्ह्यातील 23 महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या या केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबरला होणार आहे. ही आहेत जिल्ह्यातील महाविद्यालये : आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे जिल्ह्यातील 23 महाविद्यलयांमध्ये उद्घाटन होणार आाहे. या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात ‍1. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, 2. निलकंठराव शिंदे सायन्स ॲन्ड आर्ट कॉलेज भद्रावती, 3. शासकीय पॉलिटेक्निक ब्रम्हपुरी, 4. डॉ. ग्यानरत्न ‍सिव्हिल सर्विस कॉलेज भद्रावती, 5. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज चंद्रपूर, 6.गरुसाई पॉलिटेक्निक कॉलेज चंद्रपूर, 7. चिंतामणी कला व विज्ञान कॉलेज गोंडपिंपरी, 8. श्री ज्ञानेश महाविद्यालय सिंदेवाही, 9. रामचंद्रराव धोटे सिनीयर कॉलेज राजुरा, 10. राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर, 11. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, 12. सुर्वी महिला कला वाणिज्य व विज्ञान कॉलेज मुल, 13. श्री साई प्रा. इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट भद्रावती, 14. डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स चंद्रपूर, 15. स्व. गोपालराव वानखडे जुनियर कॉलेज बल्लारपूर, 16. मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी घोडपेठ भद्रावती, 17. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी. र्फाम ब्रम्हपुरी, 18. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजनियरींग रिसर्च ॲण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर, 19. अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चंद्रपूर, 20. अशोका नर्सिंग कॉलेज चंद्रपूर, 21. सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामणी बल्लारपुर, 22. प्रभादेवी स्कुल ऑफ नर्सिंग चंद्रपूर, 23. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॅालेटेक्नीक कॉलेज बेटाळा ब्रम्हपुरी अशा एकूण 23 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांनी या संदर्भात सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि प्राचार्य यांना पत्र पाठविले आहे. प्रत्येक केंद्रात आवश्यक बाबींची पुर्तता करावी. महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधू हा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी होईल, या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सुचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)