संवर्ग अधिकारी व कर्मचारी संपाला बि. ई. एफ. चे समर्थन (Cadre officers and employees went on strike B. E. F. public support of)

Vidyanshnewslive
By -
0
संवर्ग अधिकारी व कर्मचारी संपाला बि. ई. एफ. चे समर्थन (Cadre officers and employees went on strike B. E. F. public support of)


भद्रावती :- नगर परिषद, नगर पंचायती मधील संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांचा आपल्या मूलभूत मागण्याकरिता दि. 29 ऑगस्ट 24 पासून राज्यभरात बेमुदत संप सुरु आहे. या संपाला बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ने समर्थन दिलेले आहे. मा. ना. मुख्यमंत्री तथा मंत्री, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांना बि. ई. एफ.महाराष्ट्र चे सचिव सिद्धार्थ सुमन यांनी पत्र पाठवून मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी केलेली आहे. सन 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. परंतु या योजनेची अंमलबजावणी अजूनही करण्यात आली नाही. त्यामुळे 2005 नंतरच्या राज्य संवर्गातील 3000 अधिकारी आणि 60000 चे वर कर्मचारी यांना त्याचा फटका बसणार आहे. तसेच इतरही मूलभूत प्रश्न आणि समस्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याकरिता हा संप पुकारण्यात आलेला आहे. हे अधिकारी आणि कर्मचारी नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात नागरिकांच्या दैनंदिन सेवा सुविधा पुरविणाऱ्या यंत्रनेतील महत्वपूर्ण घटक आहेत. या संपामुळे नागरिकांच्या सेवा सुविधा वर परिणाम होत आहे. या वर्गाच्या मूलभूत मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष करने हे पुरोगामी महाराष्ट्र करिता योग्य नाही. करिता त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी सिद्धार्थ सुमन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केलेली आहे. या पत्राची एक प्रत संपावर असलेल्या भद्रावती नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी उप मुख्याधिकारी जगदीश गायकवाड, लेखापाल लहू लोंगरे, स्थापत्य अधिकारी राकेश महाकुलकर, कनिष्ठ लिपिक अभिषेक जांभुळे, सहाय्यक अभियंता मोनाली वांढरे, पूजा पारखी, बि. ई. एफ. असंगठीत कामगार विभागाचे  संतोषभाई रामटेके, संजय गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)