Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, दोन तलवारीसह आरोपीना अटक (Ballarpur police action, accused arrested with two swords)

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, दोन तलवारीसह आरोपीना अटक (Ballarpur police action, accused arrested with two swords)


बल्लारपूर :- ३१ ऑगस्ट ला बल्लारपूर पोलीस आगामी सण उत्सव दरम्यान रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा शोध घेत असता त्यांना माहिती मिळाली की राणी लक्ष्मी वॉर्ड येथे विधी संघर्षग्रस्त बालक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने तलवार लपवून ठेवले आहे. त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलीसांनी अटक केले आहे. तसेच किल्ला वॉर्ड येथील झाडी झुडपात आरोपी गौरव सुनील कुकूडकर वय १८ वर्ष यांनी तलवार लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेत आरोपी गौरव कुकूडकर किल्ला वॉर्ड याला अटक केले. दोन्ही आरोपीवर कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आले आहे. सदर कारवाई  पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, जाधव  उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदुर अतिरिक्त कार्यभार राजुरा यांचे मार्गदर्शनात सुनिल वि. गाडे पोलीस निरीक्षक, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, सुनिल कामटकर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार पोअं. श्रिनिवास वाभिटकर, विकास जुमनाके, लखन चव्हाण, खंडेराव माने, वशिष्ट रंगारी, शेखर माथनकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या