आर्थिक प्रलोभनाला बळी पडले अधिकारी, शेयर मार्केटच्या नावाखाली अधिकाऱ्यांची 39 लाख रुपयांची फसवणूक (Officers succumbed to financial temptation, officials cheated of Rs 39 lakhs in the name of share market)

Vidyanshnewslive
By -
0
आर्थिक प्रलोभनाला बळी पडले अधिकारी, शेयर मार्केटच्या नावाखाली अधिकाऱ्यांची 39 लाख रुपयांची फसवणूक (Officers succumbed to financial temptation, officials cheated of Rs 39 lakhs in the name of share market)


बल्लारपूर :- बल्लारपूर तहसील कार्यालयात कार्यरत तलाठी शंकर अशोकराव खरुले यांची ३९ लाख ७६ हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाली आहे. तलाठी शंकर खरूले यांना शेयर मार्केट विषयी माहिती होती. तसेच ते शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करत होते. त्यांना एका अनोळखी इसमाने कॉल करून शेयर मार्केट मध्ये इच्छुक आहे का? असे विचारून पिमको ग्रुप बद्द्ल माहिती सांगितले. तसेच ते डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. शेयर मार्केटच्या नावाने येथील तहसील कार्यालय मध्ये कार्यरत तलाठी यांना ३९ लाख रुपयाने आर्थिक फसवणूक केली आहे. डाऊनलोड केल्यानंतर तिथे त्यांचा खाता उघडण्यात आले. त्या ॲप च्या माध्यमातून ३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट चा दरम्यान वेळोवेळी फोन पे, चेक व आरटीजीएस चा माध्यमातून ३९ लाख ७६ हजार रुपये जमा केले. त्यांना त्यांचा खात्यात गुंतवणूक केले. रक्कम ची वाढ होताना दिसत होते. त्यांचा खात्यात २ करोड ३३ लाख रुपये झाल्याचे दिसले. अश्या वेळी त्यांनी त्या खात्यातून रक्कम काढण्याचा प्रयत्न केले असता. ते दुसऱ्या दिवशी खात्यात नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तलाठी शंकर अशोकराव खेरुले यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलीसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, ६६(क), ६६(ड), ३१८(४) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केले असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस निरीक्षक सुनील वि. गाडे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)