चंद्रपूर :- महाराष्ट्रात ईद-e-मिलाद या मुस्लिम सण च्या सुट्टी चा बाबतीत संभ्रम असून महाराष्ट्र शासनाने यावर स्पष्टीकरण देतांना या सणाच्या सुट्टी बाबतचा निर्णय संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर सोपवीला असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हा सण मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी जुलूसचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजीची ईद-ए-मिलाद ची सुट्टी कायम ठेवली आहे. सर्व नागरिकांनी समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून आनंदाने सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या