आगामी काळात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरात पोलिसांचा रूट मार्च, जिल्हा पोलीस अधीक्षकासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती (Police route march in Ballarpur city in view of upcoming festival, presence of police officers along with district superintendent of police and administrative officers.)

Vidyanshnewslive
By -
0
आगामी काळात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरात पोलिसांचा रूट मार्च, जिल्हा पोलीस अधीक्षकासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती (Police route march in Ballarpur city in view of upcoming festival, presence of police officers along with district superintendent of police and administrative officers.)


बल्लारपूर :- आगामी अनंत चतुदशी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद मध्ये बंधुत्व कायम राखण्यासाठी बल्लारपूर पोलीसांनी शहरात रूट मार्च केले. कॉलरी काटा गेट पासून सुरू झालेले हे रूट मार्च सातनल चौक, गांधी पुतळा, गोल पुल, गणपती वॉर्ड मार्गे नवीन बस स्टँड, रेल्वे चौक, जुना बस स्टँड, बुध्द नगर वॉर्ड, कारवा रोड, मक्का मस्जिद, दीनदयाळ वॉर्ड, न्यू कॉलनी, कादरीया मस्जिद मार्गे पेपर मिल तीन एका गेट ते बल्लारपूर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आले. या रूट मार्च चे नेतृत्व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे व बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केले. या रूट मार्च मध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रिडवार, गायकवाड, दिवटे, पठाण, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह, गोविंद चाटे, धनंजय गिन्नलवार, महिला पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे तसेच पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शीघ्र कृती दल, एसआरपी,  होमगार्ड सह २०० चे वर पोलीस शामिल झाले होते. सदर रूट मार्च दरम्यान मंदिर, मस्जिद, गणेश मंडळ जवळ थांबून पाहणी केले. या रूट मार्च मध्ये शहरात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचा सहभाग होता. तसेच बल्लारपूर चे तहसीलदार ओंकार ठाकरे, नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, अपर तहसीलदार कोठारी श्रीमती कोकाटे, महावितरण चे अभियंता काटकर सुद्धा सहभाग झाले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)