वंचित बहुजन आघाडीचा उद्या बल्लारपूरात कार्यकर्ता मेळावा (Vanchit Bahujan Aghadi will hold a worker meeting in Ballarpur tomorrow)

Vidyanshnewslive
By -
0
वंचित बहुजन आघाडीचा उद्या बल्लारपूरात कार्यकर्ता मेळावा (Vanchit Bahujan Aghadi will hold a worker meeting in Ballarpur tomorrow)

बल्लारपूर :- 15 सप्टेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर- मुल - पोभूर्णा विधानसभा तर्फे बल्लारपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचे चे निष्ठावंत कार्यकर्ते व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांना आवाहन आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा
मेळावा चे कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.निलेशदादा विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन युवा आघाडी तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.फारुखजी अहमद राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी, मा. डॉ.प्रा.निशाताई शेंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, मा.सविताताई मुंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, मा. शमीभाताई पाटील महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी, मा. कुशलभाऊ मेश्राम महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन आघाडी सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)