चंद्रपूरात भाऊ ठरला जीवाचा वैरी, दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या ! (In Chandrapur, the brother became the enemy of life, the drunken brother killed his brother with an ax !)
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयाच्या मागे सख्ख्या भावाने भावाचीच हत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना काल रात्री 9 वाजता घडली. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आरटीओ कार्यालयाच्या मागे उडिया मोहल्ला येथे राहणारे गणेश गेडाम यांची सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. ७ ऑगस्ट ला रात्री 9 वाजता गणेश पुंडलिक गेडाम हा घरी जेवण करीत होता. त्यावेळी त्याचा भाऊ मंगल पुंडलिक गेडाम घरी आला. तो दारू च्या नशेत होता, त्याने भावाला शिवीगाळ करीत वाद सुरु केला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर तिथे ठेवलेली कुऱ्हाडीने गणेश च्या गळा व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला, रक्तबंबाळ अवस्थेत वार्डातील रहिवाश्यांनी गणेश ला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेत गणेश यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी मंगल गेडाम ला अटक केली. उत्तरीय तपासणीसाठी गणेश चा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या