बल्लारपूर :- उमेश कडू व मित्र परिवाराच्या वतीने कै. जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन आज, शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजेपासून सुभाष हॉल, नवीन बस स्टँड जवळ, बल्लारपूर येथे करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बल्लारपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील गाडे, माजी शहराध्यक्ष हरीश शर्मा, डॉ.मधुकरराव बावणे, ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने, बल्लारपूर पेपर मील कामगार सभेचे सरचिटणीस वसंत मांढरे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. के कुशल मेश्राम, माजी नगर सेवक सिक्की यादव, इस्माईल ढकवाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ.सुषमा श्याम नेत्या (USRE), डॉ.प्राजक्ता खोब्रागडे, डॉ.निलिमा अलगमकर, डॉ. अस्मिता राकेश पांडे व डॉ.देवाशीष रॉय रुग्णांची तपासणी करणार आहेत. बल्लारपूर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेश कडू व कडू मित्र परिवाराने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या