सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वर्गीकरण करण्याच्या व क्रिमिलियर लागू करण्याच्या विरोधात बल्लारपुरातील विविध सामाजिक संघटना व बहुजन समाज पार्टी बल्लारपूरच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन (A representation to the Tehsildar through various social organizations and Bahujan Samaj Party Ballarpur against the Supreme Court's classification and implementation of Crimilier.)
बल्लारपूर :- दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी 1ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वर्गीकरण करण्याच्या व क्रिमिलियर लागू करण्याच्या विरोधात बल्लारपुरातील SC/ST च्या सर्व सामाजिक संघटनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व विरोध दर्शवण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून बस स्टॅन्ड ते रेल्वे चौक ते तहसील ऑफिस पायदळ मोर्चा काढण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच या आजच्या मोर्च्यात विविध संघटनानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आंबेडकरी युथ संघटना, भारतीय बौद्ध महासभा, आरक्षण बचाव समिती, समता सैनिक दल, भीम आर्मी संघटना, वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, अश्या अनेक संघटनाचा सहभाग होता.
अनुसूचित जाती जमाती चे वर्गीकरण व त्यांना क्रीमिलेअर लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला 1 ऑगस्ट 2024 रोजी चा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे विषयी संदर्भात निवेदन देण्यात आले. देशाच्या सुप्रीम कोर्टातील सात न्यायमूर्तीच्या खंडपिठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती-जमाती चे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे संदर्भात निर्णय दिला. हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे. त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे. जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती-जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही. बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाचा भारतीय संविधानावर प्रघाड विश्वास आहे. त्यामुळेच बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC, ST मध्ये वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करण्या संदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिक रित्या विरोध केला. तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्या करिता व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी (BSP) महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजि रामजी गौतम साहेब यांच्या दिशानिर्देशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये खालील मागण्या संदर्भात सक्रिय सहभागी झाली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments