चंद्रपूरात " सामाजिक लोकशाही परिषद " चे आयोजन, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती (Organized "Social Democratic Conference" in Chandrapur, Senior Journalist Ashok Wankhede was the chief presence)
चंद्रपूर :- प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मनात त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव निर्माण करणे व संविधानातील तरतुदी पोहचविणे हे या परिषदे चे उद्दीष्ट आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चे सचिव दिलीप वावरे, उद्घाटक जिलाधिकारी विनय गौडा जी.सी. तर प्रमुख पाहुणे जिला पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन प्रमुखतेने उपस्थित राहणार आहे. प्रमुख वक्ते दिल्ली चे जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे व निवृत सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशन चे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष स्थानी राजकुमार जवादे भुषवतील. कार्यक्रमाला यशवंत बरडे, महावितरण अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, डॉ कपिल गेडाम, डॉ. विवेक बांबोळे, डॉ. प्रवीण डोंगरे, शीलवान डोके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे वर्तमान परिस्थितिमध्ये सामाजिक लोकशाही चे भवितव्य व उपाय योजना तसेच ई.झेड. खोब्रागडे हे संविधानाचे जतन संवर्धन आणि नागरिकांची भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहे.
सदर सामाजिक लोकशाही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEF) व थेंब ग्रुप या सामाजिक संघटने द्वारे 24 ऑगस्ट ला सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहा मध्ये भव्य सामाजिक लोकशाही परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बानाई चे इं.किशोर सवाने यांनी श्रमिक पत्रकार संघामध्ये आयोजित पत्रपरीषदेत दिली. या पत्रकार परिषदेलादिलीप वावरे, इंजिनियर किशोर सवाने, राजकुमार जवादे, प्रा. कोसे. राजेश वनकर, इंजिनिअर चेतन उंदीरवाडे, राजू खोब्रागडे ई उपस्थित होते. या दरम्यान शहरातील नागरीकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या