चंद्रपूरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 15 व 16 ऑगस्ट रोजी आवाहन, विविध प्रकारच्या रानभाज्यांचं होणार प्रदर्शन (Call for district level wild vegetable festival in Chandrapur on August 15 and 16, various types of wild vegetables will be exhibited)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 15 व 16 ऑगस्ट रोजी आवाहन, विविध प्रकारच्या रानभाज्यांचं होणार प्रदर्शन (Call for district level wild vegetable festival in Chandrapur on August 15 and 16, various types of wild vegetables will be exhibited)

चंद्रपूर :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चंद्रपूर व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजतापासून कृषी भवन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. रानभाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने त्यावर रासायनिक कीटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे परिपूर्ण नैसर्गिक असल्याने शहरी लोकामध्ये याबाबत जनजागृती करने आवश्यक आहे. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे 55 प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. यासाठी जिल्ह्यात दिनांक 9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत आहे. नागरिकांनी 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजी कृषी भवन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)