पाच वर्षा पूर्वी बनलेले "CC रोड" फुटले व जागो-जागी "पेवर्स" दबले याला जबाबदार कौन.? - रविभाऊ पुप्पलवार (Who is responsible for the "CC road" built five years ago burst and the "pavers" collapsed at places? - Ravi Bhau Puppalwar)

Vidyanshnewslive
By -
0
पाच वर्षा पूर्वी बनलेले "CC रोड" फुटले व जागो-जागी "पेवर्स" दबले याला जबाबदार कौन.? - रविभाऊ पुप्पलवार (Who is responsible for the "CC road" built five years ago burst and the "pavers" collapsed at places? - Ravi Bhau Puppalwar)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात पाच वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन CC रोड बनविण्यात आले होते व शहरात सौंदर्यीकरणाच्या नावाने रोडच्या लगत पेवर्स बसविण्यात आले होते परंतु आता या रोडांची आज दयनीय अवस्था झालेली आहे. जागोजागी रोड फुटले आहेत व पेवर्स दबले आहेत. तसेच अतोनात पैसा खर्च करून बनविलेले रोड पाईपलाईन आणि वायरींगसाठी फोडलेली आहेत व अश्या फोडलेल्या रोडांकडे तर धन्नासेठ ठेकेदार, सबंधित अधिकारी व बल्लारपूर शहरातील अनेक संघटना व पक्षांचे नेतेही दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. असा चक्क आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी केला आहे.


             सामान्य जनतेला तर नळाचे पाइप लाइन टाकण्यासाठी नगरपरिषद रोड रिस्टोरेशन साठी पैसे मोजायला लावते तेव्हाच नाहरकत प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात येते. तर अश्याचप्रकारे पाईपलाईन आणि वायरींगसाठी फोडले गेलेल्या रोडांसाठी रिस्टोरेशन चे पैसे घेतले जात नाही का.? नाही तर मग ही व्यवस्था सामान्य जनतेवरच का.? असे प्रश्न ही पुप्पलवार यांनी मांडले आहे. जर ठेकेदाराकडून किवा संबंधित विभागाकडून रिस्टोरेशन चे पैसे घेतले जात असेल तर त्या फुटलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल देखील पुप्पलवार यांनी उपस्थित केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)