मोठी बातमी ! एससी/एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू होणार नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण (Big news! Creamy layer will not apply in SC/ST reservation, central government clarifies)

Vidyanshnewslive
By -
0
मोठी बातमी ! एससी/एसटी आरक्षणात क्रीमिलेयर लागू होणार नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण  (Big news! Creamy layer will not apply in SC/ST reservation, central government clarifies)


वृत्तसेवा :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच् (SC/ST) या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यघटनेत दिलेल्या एससी आणि एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यघटनेत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या आरक्षण व्यवस्थेत क्रिमीलेयरची तरतूद नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. एससी आणि एसटी संदर्भात क्रिमीलेअरच्या मर्यादेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाबाबत कॅबिनेट मीटिंगमध्ये चर्चा झाली. संविधानात SC/ST बाबतच्या क्रिमीलेयरचा कुठलंही प्रावधान नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेला एनडीए सरकार बांधील आहे. या संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणात क्रिमी लेयरची तरतूद नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातले क्रिमीलेअर शोधण्यासाठी सरकारनं एक धोरण आखावं. ज्यांना आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवता येईल. SC, ST च्या क्रिमीलिअरसाठी वेगळे नियम लावता येतील, जे ओबीसी क्रिमीलिअरपेक्षा वेगळे असतील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी म्हटलं.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)