बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब व दुकान जाळपोळ प्रकरणी आरोपी सूरज गुप्ता यांना नागपुरच्या धरमपेठ परिसरातून अटक (Ballarpur petrol bomb and shop arson case Suraj Gupta arrested from Dharampeth area of Nagpur, Ballarpur police action)
बल्लारपूर :- मालू कापड दुकान पेट्रोल बॉम्ब स्फोट प्रकरणातील फरारी व संशयित आरोपी नामे सुरज संतोष गुप्ता वय 31 वर्ष यांना गुप्त सूत्रांच्या बातमी दारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शना खाली नागपूर (धरमपेठ) परिसरात सापळा रचून बल्लारपूर येथील पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, Asi गजानन डोईफोडे , Wpc मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी सापळा रचून पकडले. विशेष म्हणजे सूरज गुप्ता मागील दीड वर्षांपासून फरारी होता तसेच बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब प्रकरण राजकीय दृष्टया ही खूप गाजले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा विषय मांडला तर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी कायदा व सुव्यवस्था वर प्रश्न निर्माण केले होते मात्र एकूणच बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या