बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रक्रिया बल्लारपूरातून करावी - हेल्पिगं हॅन्ड फॉउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून निवडणूक आयुक्ताना निवेदन (Election process of Ballarpur Assembly Constituency should be done from Ballarpur - Statement to Election Commissioner through Helping Hand Foundation Trust)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रक्रिया बल्लारपूरातून करावी - हेल्पिगं हॅन्ड फॉउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून निवडणूक आयुक्ताना निवेदन (Election process of Ballarpur Assembly Constituency should be done from Ballarpur - Statement to Election Commissioner through Helping Hand Foundation Trust)


बल्लारपूर :- बल्लारपूर विधानसभा मतदार संघ ७२ ची निर्मिती झाली तेव्हा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय नव्हते. त्यामुळे मुल उपविभागीय कार्यालयातुन उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि मतमोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेव्हापासून निवडणुकीशी संबंधित सर्व कार्यक्रम मुल तहसीलमधूनच राबविले जात असल्याने बल्लारपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ५० किलोमीटर अंतरावर जाऊन त्यांना छोट्या कागदपत्रां साठी तितकेच अंतर पार करावे लागत आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू असून इतर सर्व सुविधाही येथे उपलब्ध आहेत. २०१२ च्या जनगणनेनुसार, लोकसंख्या ८९ हजार ४५२ आहे, तर जवळपासच्या गावांची संख्या १ लाख ३३ हजार ५६० आहे. बल्लारपूर हा शहरी (ब) दर्जाची नगरपरिषद आहे. तसेच बल्लारपूर शहर हे राष्ट्रीय महामार्ग सोबतच रेल्वेचे स्थानक असल्यामुळे सोयीचे आहे लोकसंख्येच्या निकषावर बल्लारपूर हा इतर तालुक्यांमध्ये सर्वात मोठा तालुका आहे. शिवाय मुल बल्लारपूरपासून ५० किमी अंतरावर आहे म्हणून बल्लारपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरणे आणि मतमोजणी करण्याची व्यवस्था करा जेणेकरून परिसरातील जनतेला सुविधा मिळू शकते. बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी संबंधीची सर्व कामे बल्लारपूर मधूनच करावीत, अशी मागणी हेल्पिंग हँड्स फाऊंडेशन ट्रस्टने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये प्रकाश दोतपेल्ली, श्रीनिवास चेरकुतोटावार, संजय मुप्पीडवार आणि नारायण सुखा यांचा समावेश होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)