राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन होणार (A 'superstition eradication cell' will be established in every police station in the state)

Vidyanshnewslive
By -
0
राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन होणार (A 'superstition eradication cell' will be established in every police station in the state)


वृत्तसेवा :- राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करावेत, असा आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलिस आयुक्त, सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवले गेले आहेत. अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, " ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जादूटोणाविरोधी कायदा राज्यात लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे." हे कक्ष स्थापन झाल्यावर त्यांची जिल्हावार माहिती पोलिसांनी जनतेसमोर जाहीर करावी, जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासक पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे. - मुक्ता दाभोलकर, अंनिसच्या समितीच्या राज्य कमिटी सदस्य

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)