धक्कादायक ! दारूच्या पैशाच्या वादातुन मुलाने केली जन्मदात्या पित्याची हत्या (Shocking! Child killed birth father due to dispute over liquor money)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! दारूच्या पैशाच्या वादातुन मुलाने केली जन्मदात्या पित्याची हत्या (Shocking! Child killed birth father due to dispute over liquor money)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात दारुड्या मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दारूच्या पैशावरून आरोपी आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाल्याने ही घटना घडली. अचानक रागाच्या भरात मुलाने वडिलांवर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात दारू पिण्यासाठी घरी पैसे मागितल्याच्या कारणावरून मुलगा आणि वडील यांच्यात झालेल्या वादात मुलाने वडिलांशी हाणामारी केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आबाजी रामटेके असे मृताचे नाव असून, अमित अशोक रामटेके (24) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या संदर्भात मयत अशोक हा त्याचा चुलत भाऊ कैकडू रामटेके याच्याशी पत्नीसमोर चर्चा करत होता. त्यानंतर आरोपी अमित तेथे आला आणि दारू पिण्यासाठी घरी पैसे का मागतोस, अशी विचारणा केली. मला दारूचे व्यसन आहे तर दारू पिऊन शांत का झोपत नाही, असे सांगताच अशोक आणि अमित यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. वडील अशोक गंभीर जखमी झाले. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अशोकला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी अमित रामटेकेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक रामटेके यांनी कर्ज फेडण्यासाठी पत्नी अर्चना अशोक रामटेके यांच्याकडे कानातली अंगठी मागितली. पत्नीने त्याला 500 रुपये दिले. मयताने त्यातून 400 रुपये उसने घेतले आणि 100 रुपये स्वत:कडे ठेवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)