महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन (Appeal to take advantage of various schemes of Mahatma Phule Backward Development Corporation)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन (Appeal to take advantage of various schemes of Mahatma Phule Backward Development Corporation)


चंद्रपूर :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपूर मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2024-25 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजने अंतर्गत 80 लाभार्थ्यांचे, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांचे , थेट कर्ज योजनेअंतर्गत 38 लाभार्थ्यांचे व जनरल प्रशिक्षण योजनेअंतर्गत 250 प्रशिक्षणार्थींचे असे एकुण 198 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे व 250 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. अनुदान योजना प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत, सदर योजनेत 25 हजार पर्यंत कर्ज बँकमार्फत दिले जाते व 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे. बिज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळा मार्फत 4 टक्के द. सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. 75टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्तयानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्याचा सहभाग असतो. थेट कर्ज योजना प्रकल्प मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादा 45 हजार रुपये कर्ज, महामंडळामार्फत 4 टक्के द. सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार रुपये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवुन दिलेल्या समान मासिक हप्तयानुसार 3 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतेा. प्रशिक्षण योजना अनुसूचित जातीतील लाभधारकांना व्यवसाया साठी लागणारे तांत्रीक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यवसायीक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत 2 किंवा 3 महिने मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणार्थींना 1 हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येते. वरील सर्व योजनांच्या अधिक माहिती करीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय दुध डेअरी जवळ, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)