जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्याला पुन्हा 3 दिवसांचा येलो अलर्ट (Heavy rain in Chandrapur district, yellow alert for 3 days again)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्याला पुन्हा 3 दिवसांचा येलो अलर्ट (Heavy rain in Chandrapur district, yellow alert for 3 days again)
चंद्रपूर :- संपुर्ण जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने 26 जुलैपर्यंत चार दिवस येलो अलर्टचा इशारा दिला आहे. या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमार्ग बंद पडले आहेत. याबरोबरच शेतामध्ये पुराचे पाणी साचल्याने रोवणी बंद पडल्या आहेत. हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला होता. दोन्ही दिवस चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बल्लारपूर - राजुरा मार्ग बंद होण्याच्या मार्गांवर आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)