राजुरा येथील गोळीबार प्रकरणात दोन आरोपीना शस्त्रासह अटक, स्थानिक गुन्हे शाखेची पोलिसांची कारवाई (Two accused arrested with weapons in Rajura firing case, police action of local crime branch)

Vidyanshnewslive
By -
0
राजुरा येथील गोळीबार प्रकरणात दोन आरोपीना शस्त्रासह अटक, स्थानिक गुन्हे शाखेची पोलिसांची कारवाई (Two accused arrested with weapons in Rajura firing case, police action of local crime branch)


राजुरा :- 23 जुलै रोजी राजूरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पुरा येथील लल्ली शेरगिल याचेवर झालेल्या प्राणघातक हल्याच्या जुन्या वैमानस्यातुन आरोपी लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोनू कदिर शेख दोघेही रा. राजूरा यांनी 23 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. चे सुमारास पंचायत समीती चौक राजूरा येथे शिवज्योत सिंह देवल याचे वर गोळीबार करून फरार झाले. नुकतेच चंद्रपूर शहरातील एका व्यापारी संकुलात मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष यांचेवर गोळीबार झाला त्यानंतर बल्लारपूर शहरातील व्यवसायिकाच्या दुकानावर बॉम्ब हल्ला झाला हे प्रकरण शांत होत नाही तेच दिनांक 23 जुलै रोजी राजुरा शहरातील भर चौकात लल्ली शेरगिल याचे वर गोळीबार झाला यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेने राजुरा शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अवघ्या काही तासातच आरोपी लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोनू कादीर शेख या दोन्ही आरोपींना हत्यारासह ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजूरा पोलीस स्टेशन करित आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)