Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्ब प्रकरणी आरोपीना अटक, सूत्रांची माहिती (Accused arrested in Ballarpur petrol bomb case, according to sources)

बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्ब प्रकरणी आरोपीना अटक, सूत्रांची माहिती (Accused arrested in Ballarpur petrol bomb case, according to sources)


चंद्रपूर : बल्लारपूर येथील गांधी चौक परिसरातील 7 जुलै रोजी एका कापड दुकानदारा वर 3 अज्ञात युवकांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता. त्या घटनेतील आरोपींना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त होत असून सदर आरोपी पेट्रोल बॉम्ब हल्ला करून पळून गेले होते. सदर घटनेबाबतच्या गुन्ह्याची नोंद बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, हे तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखा LCB चंद्रपूर, बल्लारपूर पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर, येथून ताब्यात घेवून अटक केली आहे. सदर आरोपी हे जबलपूर येथील कुख्यात गॅगस्टर असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित 2 आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारपूर, यांच्या मार्फतीने अटक करण्यात आली असून याबाबतचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या