बल्लारपूर :- बल्लारपूर वनविभागाच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या शेतात आज सकाळी चरायला गेलेल्या म्हशींचा जीवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने व रात्री पाऊस तसेच वाऱ्यामुळे तीन-चार विद्युत खांब पडल्याने 12 म्हशीचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला तर पंधरा ते वीस म्हशी जखमी झाल्याची घटना या वनक्षेत्रात घडली याबाबत यादव स्वीट्सचे संचालक देवेंद्र यादव यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ याघटनेची तक्रार केली. ते महावितरण विभागाच्या उपकेंद्रात, बल्लारशाह येथे थेट लाईन बंद करण्यास दिरंगाई मुळे किंवा तांत्रिक कारणामुळे एक तासापेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे म्हशींचा मृत्यू झाला असता, जर वेळेत वीज बंद झाली असती वाचवता आले असते. जंगलात मॉर्निंग वॉक करणारे नागरिकही थेट वायरच्या संपर्कात येण्यापासून बचावले आहेत, याप्रकरणी देवेंद्र यादव यांनी या घटनेची तक्रार महावितरण विभागाकडे केली आहे या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता मौलाना आझाद वॉर्डातील रहिवासी देवेंद्र यादव यांच्या सहा म्हशी, संतोषी माता वार्डातील रहिवासी रोशन पाल यांच्या पाच म्हशी व एक म्हैस आढळून आली. या घटनेत विनोद कैथवास यांचा एका म्हशीचा मृत्यू झाला असून या म्हशींचे अकारण मृत्यूमुळे मालकांचे सुमारे 12 लाखांचे नुकसान झाले असून या म्हशींचा अधिक तपास सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या