ओरेज अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज 27 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंदजिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश (Anganwadi schools, colleges and private coaching classes closed in Chandrapur district today on July 27 in the wake of Orage Alert, District Collector has issued orders.)

Vidyanshnewslive
By -
0
ओरेज अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज 27 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद
जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश (Anganwadi schools, colleges and private coaching classes closed in Chandrapur district today on July 27 in the wake of Orage Alert, District Collector has issued orders.)



चंद्रपूर :- गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस 27 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 - 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्यूज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)