लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रपूरात चर्चात्मक कार्यक्रमात "दारू" विषयावरून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडले (On the occasion of the Lok Sabha elections, political party activists clashed over the topic of "liquor" in a discussion program in Chandrapur.)
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या चर्चात्मक कार्यक्रमात ‘दारू’चा विषय छेडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते आपसात भिडले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची लढत आहे. पहिल्याच टप्प्यात मतदान असल्याने सर्व प्रसार माध्यमांचे लक्ष या हेविवेट लढतीकडे लागले आहे. विविध इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या वतीने येथे संवादात्मक, चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. शनिवारी सायंकाळी येथील रामाला तलाव परिसरात एका वृत्तवाहिनीच्या वतीने अशाच एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, रिपाई, बसप, वंचित बहुजन आघाडी तसेच इतरही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते. चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर चर्चा सुरू असतानाच कुणीतरी “दारू ” चा विषय छेडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चांगलेच भडकले. दारू हा विषय चर्चेत आणू नका अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व भाजपचे माजी ग्रामीण अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे दिलीप चौधरी यांनी केली. मात्र त्यानंतर वातावरण आणखी बिघडले व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ते आपसात भिडले. हा वाद शांत करण्यासाठी चौधरी, भोंगळे व पावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच ऐकायला तयार नव्हते. शेवटी वादावादीनंतर कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. या निवडणुकीत दारू हा विषय चर्चेत आणू नये अशी विनंती यापूर्वीच एका मोठ्या दारू विक्रेत्याने जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेत्यांना केली आहे. मात्र त्यानंतरही माध्यमांच्या चर्चेत दारू हा विषय चर्चेत आल्याने चांगलेच वादळ उठले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांचा दारू व्यवसाय आहे. याचा महिलांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो असेही बोलले जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments