यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क (In Yavatmal, District Collectors exercised their right to vote by standing in queues like ordinary citizens)

Vidyanshnewslive
By -
0
यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क (In Yavatmal, District Collectors exercised their right to vote by standing in queues like ordinary citizens)
अनेक नवरदेवांची " आधी लग्न लोकशाहीचे " या उक्तीप्रमाणे बजावला मतदानाचा हक्क

वृत्तसेवा :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ नंतर मतदानासाठी गर्दी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्वसामान्य मतदरांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आज येथील शिवाजी विद्यालयात रांगेत उभे राहून मतदान केले. ते काळी १० वाजातच्या सुमारास पत्नीसह मतदानासाठी मतदान केंद्रावर आले. त्यानंतर सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनी मतदान करण्यासाठी नागरिक उभे असलेल्या रांगेत उभे राहून प्रतीक्षा केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणतीही विशेष सुविधा घेण्याचे त्यांनी नम्रपणे नाकारले. आपण सर्वसामान्य मतदार आहे आणि सर्वसामान्यप्रमाणेच मतदान करेल, अशा सूचना उपस्थितांना केल्या. मतदानानंतर आशिया दांपत्याने मतदान केल्याचे शाई लावलेले बोट दाखवत, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.
           आज विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी वधू-वरांनी ‘आधी लगीन लोकशाहीचे…’ या उक्तीप्रमाणे मतदान करून ते नंतर विवाहासाठी रवाना झाले. दिग्रस येथील संदेश अस्वार या नवरदेवाने वरात निघण्यापूर्वी वऱ्हादड्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अस्वार यांची वरात अमरावतीकडे रवाना झाली. दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथील नवरदेव रामेश्वर प्रेमसींग राठोड यांनी मतदान करून नंतर ते विवाहासाठी भोपापूरकडे रवाना झाले. ॲड. समीर गावंडे या वराने राळेगाव तालुक्यातील परसोडी येथील मतदान केंद्रावर पहिले मतदानाचा हक्क बजावला आणि नंतर ते हक्काने विवाह करण्यासाठी रवाना झाले. नव तरुणांनी स्वतःच्या विवाहापूर्वी मतदान करून आधी लोकशाहीचे लगीन लावण्यासाठी घेतलेला हा पुढाकार व दाखविलेले जबाबदारीचे भान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)