अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत बामणी राजुरा रोड वर आढळला, ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Unidentified person found injured on Bamani Rajura Road, Ballarpur Police appeal for identification)
बल्लारपूर :- पोस्टे बल्लारपुर हद्दीत दि. 26/04/2024 रोजी सकाळी 08/35 वा च्या सुमारास बामणी ते राजुरा रोडवर वर्धा नदिकाठावरील पुलाशेजारी बामणी बाजुला स्पिड ब्रेकर वर MH 33 E 54 बजाज सिटी 100 काळया रंगाची हीचा अपघात झाला असुन अपघातामधील जखमी व्यक्ती शासकिय रूग्नालय चंद्रपुर येथे ICU मध्ये भरती असुन बेषुद्ध अवस्थेत असुन अजुन त्याची ओळख पटलेली नसुन पोस्टे बल्लारपूर अपघात रजीस्टर नोेंद क्र 17 /2024 अन्वये नोंद करून पुढील तपास सुरू आहे. जखमीचे वर्णन वय अंदाजन 45 ते 50 वर्श वयोगटातील, रंग काळा, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच , बांधा जाड, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, काळया रंगाची पॅंट तसेच दाडीचे केस पांढरे झालेले आहेत व दाढी थोडीसी वाढलेली आहे. करीता वरील वर्णनाचे ईसमाचे आपले ओळखीचे असल्यास संपर्क साधावा गोविंद चाटे (पोलीस उपनिरीक्षक) मो.9860601816 असे आवाहन बल्लारपूर पोलिसांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या