लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 एप्रिलला तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी 15 एप्रिलला चंद्रपूरात प्रचार सभा (Prime Minister Narendra Modi on April 8 and Congress leader Priyanka Gandhi on April 15 campaign meeting in Chandrapur in the wake of the Lok Sabha elections)

Vidyanshnewslive
By -
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 एप्रिलला तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी 15 एप्रिलला चंद्रपूरात प्रचार सभा (Prime Minister Narendra Modi on April 8 and Congress leader Priyanka Gandhi on April 15 campaign meeting in Chandrapur in the wake of the Lok Sabha elections)
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. सभेसाठी किमान पाच ते सात हजार वाहने ग्रामीण भागातून येणार असल्याने वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तथा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. भाजप कार्यकर्तेदेखील सभास्थळ पाहून आलेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे. Qसभेची जय्यत तयारी सुरू असून ती यशस्वी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.
                लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. राहुल गांधी यांची भंडाऱ्यात तर प्रियांका गांधी यांची चंद्रपूरमध्ये प्रचार सभा पार पडणार आहे. यासोबतच प्रियंका गांधी १५ एप्रिलला चंद्रपुरात सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राहुल गांधी यांची १३ एप्रिलला भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)