बल्लारपूरात दोन दिवसात 3 व्यक्तींनी विविध प्रकारे केल्या आत्महत्या (3 persons committed suicide in different ways in two days in Ballarpur)
बल्लारपूर :- शहरातील किल्ला वार्ड येथील केशव ऋषी खेडेकर वय ७३ वर्ष यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ मार्च गुरुवारला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. केशव खेडेकर हे मागील चार पाच महिन्यांपासून डोक्याच्या आजाराने खूप त्रस्त होते. असाह्य वेदनेला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा बेत रचला. घरी ते व त्यांची पत्नीचं राहते. पत्नी ही काही कामा निमित्त शेजारी बाहेर गेल्याचे हेरून त्यांनी घरीच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. पत्नी घरी आली असता; हे दृश्य बघून हादरून गेली तीने या बाबत आपल्या पुतण्याला कळवले त्यांनी या बाबतची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली असता पोलीस उपनिरीक्षक गिन्नलवार आपल्या पथकासह घटास्थळी दाखल झाले. केशव खेडेकर हे लोकमतचे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, पुतणे, सून नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांनी मर्ग दाखल करत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय पाठविला. खेडेकर यांच्या टोकाच्या निर्णयाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिन्नलवार व त्यांचे पथक करत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या