चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान, जिल्हाधिकाऱ्यासह राजकीय नेत्यांचे रांगेत लागून मतदान (Chandrapur Lok Sabha Constituency 55.11 percent polling till 5 pm, District Collector along with political leaders lined up to vote)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान, जिल्हाधिकाऱ्यासह राजकीय नेत्यांचे रांगेत लागून मतदान (Chandrapur Lok Sabha Constituency 55.11 percent polling till 5 pm, District Collector along with political leaders lined up to vote)
चंद्रपूर :- 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 लक्ष 26 हजार 229 पुरुष मतदारांनी (55.64 टक्के), 4 लक्ष 86 हजार 708 स्त्री मतदारांनी (54.56 टक्के) तर पाच इतर नागरिकांनी (10.42 टक्के) असे 10 लक्ष 12 हजार 942 (55.11 टक्के) मतदारांनी मतदान केले.
         लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची गर्दी दिसून आली. तसेच पहिल्यांदाच मतदान करणा-यांमध्ये उत्साह निदर्शनास आला.
              जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापन मतदान केंद्र, युवा कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. जिल्हाधिकारीही मतदानासाठी रांगेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सहपरिवार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सुरवातीला मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर मतदान करण्यासाठी ते स्वत: रांगेत उभे राहिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)