वृत्तसेवा :- एकदा बाबासाहेबांना विचारले, "मी असे ऐकले आहे की, तुमचे ग्रंथालय हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालयात पैकी एक आहे." बाबासाहेब हसले आणि म्हणाले, "मला खात्री नाही, कि हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे किंवा नाही. पण आपल्या देशातील एक सुंदर ग्रंथालय आहे, एवढे मात्र नक्की. माझ्याकडे ३३००० पुस्तके आहेत. त्यातील काही पुस्तके दुर्मिळ आणि एकमेव आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये राज्यशास्त्र पासून ते पोल्ट्री आणि 'थेअरीऑफ रिलेटीव्हीटी' पासून ते बुद्धतत्व यांचा समावेश होता. त्यांनी वास्तुविद्यापासून कृषिशास्त्र या विषयात संशोधन केले होते. वर उल्लेख केलेले ऐतिहासिक अनुभव ते हेच होते. त्यामुळेच डॉ. आंबेडकर बोलत असताना अगदी मोठ्या प्रमाणावर वरील ठिबक सिंचन ते अणूऊर्जा किंवा कोळसा उत्खनन या विषयावर ही सहजपणे बोलत असत.
एकदा त्यांना विचारले होते, "तुम्ही तुमच्या कित्येक तासांच्या अभ्यासातून निवांतपणा कसा मिळविता"? त्यावर ते म्हणाले, "माझ्यासाठी निवांतपणा म्हणजे एका प्रकरणातून दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या प्रकरणाच्या अभ्यासाकडे वळणे असते". एकदा तर एका ब्रिटिश आयोगाला काही जुने अहवाल हवे होते. त्यासाठी त्यांनी देशभर अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती त्यांना सापडली नाहीत. शेवटी त्यांना डॉ.आंबेडकर यांच्या ग्रंथालयाविषयी माहिती मिळाली. त्या ठिकाणी त्यांना संबंधित रिपोर्ट मिळाला. बाबासाहेबांनी त्यांना तो रिपोर्ट काम झाल्यानंतर परत देण्याच्या अटीवर दिला. बाबासाहेबांच्या ग्रंथालयापेक्षा तेथील पुस्तकांविषयी असणारी त्यांची माहिती आणि स्मरणशक्ती अचंबित करणारी होती. एकदा बाबासाहेबांना त्यांच्या लेखनासाठी काही संदर्भ हवे होते, मात्र ते सापडत नव्हते. शेवटी त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला बोलावले आणि पुस्तक शोधायला सांगितले. हा सहकारी त्यांचा कोलंबिया विद्यापीठातील सहअध्यायी होता. त्यालाही ते शोधता येईना, तेव्हा डॉ.आंबेडकरांनी त्याला रजिस्टरमधील अनुक्रमाणिका पाहणे सोडून दे, असे सांगितले आणि त्या भव्य ग्रंथालयातील एका शेल्फमध्ये एका विशिष्ट आकारातील आणि रंगातील पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. त्यांना हवे असणारे पुस्तक बरोबर तेच होते. पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यास विनम्र अभिवादन. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना मंगलमय कामना💐💐💐
संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर. संदर्भ-'आंबेडकर-अनुयायांच्या नजरेतून, मधुश्री पब्लिकेशन, पान नं.१३७.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या