धक्कादायक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून जवळपास 48 लाख रु ची चोरी झाल्याची सूत्रांची माहिती (Shocking! According to sources, nearly Rs 48 lakh was stolen from the school education department account)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून जवळपास 48 लाख रु ची चोरी झाल्याची सूत्रांची माहिती (Shocking! According to sources, nearly Rs 48 lakh was stolen from the school education department account)
मुंबई :- शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या  खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे. मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्य भूवया उंचावल्या आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहे. ही गंभीर बाब आहे. हे पहिली वेळ नसून दुसरी वेळ आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यतच पर्यटन विभागाच्य खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून आता तरी शासन काय करणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडला आहे. चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने चोरीची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे गुन्हाही दाखल केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)