“सम्राट अशोक” यांचा शोध लावणारा जेम्स प्रिन्सेप. १८२ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...(२० ऑगस्ट १७९९ - २२ एप्रिल १८४०). James Prinsep, inventor of “Emperor Ashoka”. Greetings on the 182nd anniversary of...(20th August 1799 - 22nd April 1840).

Vidyanshnewslive
By -
0
सम्राट अशोक” यांचा शोध लावणारा जेम्स प्रिन्सेप. १८२ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...(२० ऑगस्ट १७९९ - २२ एप्रिल १८४०). James Prinsep, inventor of “Emperor Ashoka”. Greetings on the 182nd anniversary of...(20th August 1799 - 22nd April 1840).
वृत्तसेवा :- दिल्लीच्या स्तंभावर कोरलेले काही शब्द जेम्सने वाचले ते असे होते देवनामपिय पियदस्सी" राजा बौद्ध साहित्यात कदाचित हा सर्वांत प्रसिद्ध शब्दसमूह आहे. असाच उल्लेख गिरनारच्या शिलालेखात पण आहे. जेम्स प्रिंसेपला कोडे पडले की, देवानामपिय पियदस्सी राजा ही कोण व्यक्ती होती. जेम्सची पहिली प्रतिक्रिया होती की, शिलालेख स्वतः बुद्धाच्या आदेशानुसार कोरण्यात आले असावे. नंतर त्याच्या लक्षात आले की त्याच लिपीमध्ये शिलालेख, ताम्रपत्रावर लेख, इत्यादी गिरनार (भारताच्या उत्तर - पश्चिम भागात) येथेही सापडले होते. दिल्ली, गिरनार, ओडिशा असे लांबलांबच्या प्रदेशात एकसारखे शिलालेख लावण्याची कुवत आणि शक्ती कोठल्या राजाची होती ? असा कोण राजा झाला आहे की ज्याचे राज्य भारतात इतक्या व्यापक व विस्तृत प्रमाणावर होते. जेम्ससाठी हा कूटप्रश्न होता आणि काही दिवस तो गोंधळून गेला" होता . पुन्हा पुन्हा वाचन केल्यावर त्याला इतके कळले की, ह्या राजाने सामान्यजनांच्या हितासाठी शिलालेख लावले होते. लेखांत असे म्हटले होते देवा पियदस्सी राजा माझ्या राजपदाच्या अमुक अमुक साली हा शिल्लेख माझ्या आदेशानुसार सामान्यजनांच्या हितासाठी कोरलेला आहे. " कितीही प्रयत्न केले तरी ' देवानामपिय'चे कोडे सुटत नव्हते. त्याचे एक कारण श्रीलंकेच्या ( सिलोनच्या ) एका कथेप्रमाणे तिथला राजा देवेनपिटीस्सा ह्याने पाटलीपुत्राच्या राजाला ( धर्माशोकाला ) त्याचा मुलगा 'मिलिन्दु' आणि मुलगी संघमित्रा ह्या दोघांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी श्रीलंकेला पाठविण्याची विनंती केली होती. देवानामपिय आणि देवेनपिटीस्सा ह्या दोन शब्दांतील बऱ्याच साम्यतेमुळे इतिहासकारांचा गोंधळ झाला होता आणि देवानामपियची ओळख होऊ शकली नव्हती. ऑगस्ट १८३७ मध्ये इतिहासकार जॉर्ज टर्नर हा बौद्ध धर्मासंबंधी एक पुस्तक ‘दिपॉवन्श' चाळत असताना त्याचे लक्ष एका परैग्राफकडे गेले आणि तो स्तब्ध झाला. त्यात असे लिहिले होते की बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या २१८ वर्षांनंतर सत्तेवर पियदस्सी आला, जो चंद्रगुप्तचा नातू आणि बिंदुसारचा मुलगा होता आणि पदारूढ व्हायच्या अगोदर उज्जयनीचा व्हाइसरॉय होता. म्हणजे तो सम्राट अशोक होता !" देवानामपिय पियदस्सी राजा ” चा शोध अशा प्रकारे लागला. जेम्स लोकांना कामावर लावण्यात, त्यांच्याकडून काम करवून घेण्यात, तो कुचराई करत नव्हता. त्यांना प्रोत्साहित करण्यात फार तरबेज होता. लोकांना श्रेय देण्याच्या बाबतीत अनेक तो कुचराई करत नव्हता. भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची “धम्मलिपि”चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ अभ्यास जेम्स प्रिन्सेपला त्रिवार वंदन. 

संकलन :- जॉन मार्शल (एक असामान्य पुरातत्वज्ञ) पुस्तकातून .

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)