महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य स्तरीय अधिवेशन १६ मार्च ला चिंचवड (पुणे) खा. शरदचंद्र पवार व ना. देवेन्द्र फडणविस यांची उपस्थिती, चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण. (State Level Convention of Maharashtra State Marathi Journalist Association on March 16 Chinchwad (Pune) Attendance of Mr. Sharadchandra Pawar and Mr. Devendra Fadnavis, discussion session and distribution of state level awards.)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य स्तरीय अधिवेशन १६ मार्च ला चिंचवड (पुणे)
खा.शरदचंद्र पवार व ना.देवेन्द्र फडणविस यांची उपस्थिती, चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण. (State Level Convention of Maharashtra State Marathi Journalist Association on March 16 Chinchwad (Pune) Attendance of Mr. Sharadchandra Pawar and Mr. Devendra Fadnavis, discussion session and distribution of state level awards.)
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन. २०२४ पिंपरी चिंचवड (पुणे) येथे १६ मार्च ला आहेर गार्डन येथील
सभागृहात थाटात संपन्न होणार आहे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपावेतो होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनात संघाचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात राज्य शाखेचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रथम सत्राचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणविस याचे हस्ते होणार असून यावेळी राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे हे राहणार असून प्रमुख उपस्थिती माजी खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती. आ.श्रीकांत भारतीय, राज्याचा संघटक संजयजी भोकरे, आ.महेश लांडगे, आ.अण्णा बनसोडे, आ.अश्वनी जगताप, आ.सौ.उमा खापरे, संपादक आसुतोष पाटीलने, झेस्ट संपादक उदय निरगुळकर यांची राहणार आहे. या वेळी" अमृतकालीन माध्यम स्वातंत्र, भविष्य आणी पत्रकारितेतील राम"या विषयावर मोठया चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
        दुसऱ्या सत्राचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे हे राहतील. या सत्रात पत्रकरितेतील गुणवंताना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते होणार आहे.यात गोवा, दिल्ली, कर्नाटक, गुजराथ येथील जेष्ठ पत्रकार मंडळींना तर महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कार. २०२४ देऊन गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनाआधी सकाळी ९ वाजता संघटनेच्या राज्याचा पदाधिकारी, सर्व जिल्हाधक्ष यांची सभा पार पडणार असल्याचे संयोजक तथा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे. पत्रकार हल्ला कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य उपाध्यक्ष नितीन शिंदे यांनी कळविले आहे.सर्व राज्यातून येणाऱ्यांची पत्रकार संघ सभासदांसाठी निवास व्यवस्था करण्यात येणार असून जास्तीत जास्त पत्रकार मंडळींनी या अधिवेशनात उपस्थिती दर्शव्हावी असे आवाहन राज्य पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)