घरकुल लाभार्थ्यांची शासनाद्वारे फसवणूक, राजू झोडे यांचा आरोप, शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेत (Gharkul beneficiaries are being cheated by the government, Raju Zode alleges, announcement to provide sand at government rate is wanted)

Vidyanshnewslive
By -
0
घरकुल लाभार्थ्यांची शासनाद्वारे फसवणूक, राजू झोडे यांचा आरोप, शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेत (Gharkul beneficiaries are being cheated by the government, Raju Zode alleges, announcement to provide sand at government rate is wanted)
बल्लारपूर :- महाराष्ट्रातील महायुती सरकारने अर्थात शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र चंद्रपुर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळं घरकुल लाभार्थ्यांची शासनाने फसवणूक केली असून अनेकांच्या घराचे स्वप्न अर्धवट राहिले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करावा किंवा लाभार्थ्यांना रेती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात अनेक रेती घाट आहेत. या रेतीघाटांचा अद्याप शासनाने लिलाव केला नाही. परंतु रेती तस्कर दिवसरात्र रेतीची अवैध तस्करी करत असून ज्यादा भावाने रेतीची बेभानपणे विक्री करत आहेत.यात घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तर एकट्या बल्लारपूर तालुक्यात एक हजार 242 घरकुल लाभार्थी असून रेती पुरवठा होत नसल्याने काम रखडले आहे. शासकीय रेती उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण फोल ठरले असून जिल्ह्यातील रेती घाटांचा तात्काळ लिलाव करावा, तसेच शासनाने रेती शासकीय दराने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे. यावेळी श्यामभाऊ झिलपे, संपत कोरडे, गुरू कामटे, जाकिर खान , भगतसिंह झगड़ा, नविन डेविड पंचशील तामगाडगे, आदि उपस्थित होते

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)