ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती (Inauguration of Advantage Chandrapur 'Industrial Expo and Business Conclave' on 4th March, Union Minister Nitin Gadkari, Narayan Rane and Industries Minister Uday Samant attended.)

Vidyanshnewslive
By -
0
ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती (Inauguration of Advantage Chandrapur 'Industrial Expo and Business Conclave' on 4th March, Union Minister Nitin Gadkari, Narayan Rane and Industries Minister Uday Samant attended.)
चंद्रपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 - इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह' चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे. चंद्रपूर वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या ‘अडव्‍हांटेज चंद्रपूर 2024’ ला उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारचे सहकार्य लाभले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे सामर्थ्य प्रदर्शित करतानाच या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणे, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाच्या बाबतीत चंद्रपूर आणि आसपासच्या प्रदेशाच्या मागासलेपणाबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि उद्योग तज्ञांचे मार्गदर्शन देऊन स्थानिक व्यवसाय, उद्योजक, गट यांना सहाय्य करणे ही या आयोजनामागची प्रमुख उद्दिष्टे आहे. विविध सत्रांचे आयोजन दि.4 मार्च रोजी वन अकादमी येथील प्रभा सभागृहात दुपारी 2.30 वाजता ‘आर्यन अँड स्‍टील’ विषयावर तर दुपारी 4.30 वाजता ‘मायनिंग अँड कोल’ विषयावर तसेच सिद्धांत हॉलमध्‍ये दुपारी 2.30 वाजता ‘अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ या विषयावर आणि दुपारी 6.30 वाजता होणाऱ्या ‘अग्रीकल्‍चर अँड अलाइड सेक्‍टर्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित आहे. 5 तारखेला प्रभा हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘एफआयडीसी अँड बांबू’ व दुपारी 12.30 वाजताच्‍या ‘बांबू इंडस्‍ट्री’ या विषयावर, दुपारी 3.00 वाजता ‘एज्‍युकेशन अँड स्‍कील डेव्‍हलपमेंट’ या विषयावर, सिद्धांत हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘फायनान्‍स अँड स्‍टार्टअप’ दुपारी 12.30 वाजता ‘सर्क्‍युलन इकॉनॉमी’ वर तर दुपारी 3.00 वाजता होणा-या ‘सिमेंट अँड लाईमस्‍टोन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता विपिन पालिवाल यांचे मोटिव्‍हेशनल टॉक होईल. या मेगा एक्स्पोला महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून तसेच परदेशातील व्यापारी, उद्योगपती, उद्योजक, नोकरी-उत्सुक, एमएसएमई, व्यवसाय, उद्योग तज्ञ आदींची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)