दुर्दैवी घटना ! राजुरा (सास्ती) येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडुन मृत्यू, आर्थिक मदतीची मागणी - सास्ती येथे तणाव (Unfortunate incident ! Rajura (Sasti) Two students drown in drain, demand financial help - Tension in Sasti)

Vidyanshnewslive
By -
0
दुर्दैवी घटना ! राजुरा (सास्ती) येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडुन मृत्यू, आर्थिक मदतीची मागणी - सास्ती येथे तणाव (Unfortunate incident ! Rajura (Sasti) Two students drown in drain, demand financial help - Tension in Sasti)
राजुरा - राजुरा तालुक्यातील सास्ती या गावात  आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या संदर्भात विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार हे दोघेही मित्र सास्ती लगतच्या नाल्यावर पोहण्यासाठी आले होते या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय - 17 व साहिल रमेश कुंदलवार, वय - 15 अशी आहेत. हे दोघेही मित्र सास्ती लगतच्या नाल्यावर पोहण्यासाठी आले होते. प्राप्त माहितीनुसार सास्ती या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या इनटेक विहीरीजवळ नाल्याचे बाजुला वेकोलिच्या चड्डा या कंत्राटी कंपनीने माती टाकल्याने तिथे पाणी जमा होऊन तलाव निर्माण झाला. या तलाव सदृश्य जमा झालेल्या पाण्यात हे दोन विद्यार्थी पोहायला गेल्यावर पाण्याचा आणि तेथील मातीच्या गाळाचा अंदाज न आल्याने ते फसले आणि त्यातच त्या दोन्ही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. यातील एक विद्यार्थी इयत्ता 11 वी व दुसरा इयत्ता 9 वीत होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)