मुंबई :- 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत्या 12 मार्च ला मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारच वितरण होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील अनेक मत्र्याची उपस्थिती राहणार असून यनिमित्ताने राज्यभरातील एकूण 252 व्यक्ती व संस्था या सदर पुरस्कार देण्यात येणार आहे 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराच वितरण होणार असून येणाऱ्या निवडणुकीत मताच्या अपेक्षेने 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.
व्यक्तींसाठीचे निकष : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा १० वर्षाचा अनुभव. व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे.
संस्था : संस्थेत कोणताही गैरव्यवहार नसावा.
संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आवश्यक. मागील ५ वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक. या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या