चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचा उद्घाटन सोहळा दिनांक 11 मार्च 2024 आयोजित करण्यात आलेला आले. या पार्श्वभूमीवर बॉटनिकल गार्डन नववधू सारखं सजतेय बॉटनिकल गार्डनच्या या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, ना. चंद्रकांत पाटील, ना. सुधिर मुनगंटीवार, आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच महाराष्ट्र राज्याचे इतर मंत्री महोदय व मान्यवर, उपस्थित राहणार आहेत. या करीता बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवणे आवश्यक असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले. या अनुषंगाने वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा किंवा गडचांदूर कडे जाण्यासाठी पडोली - धानोरा फाटा - भोयगाव रोडचा अवलंब करावा, गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडे येण्यासाठी भोयगाव - धानोरा फाटा - पडोली या मार्गाचा वापर करावा, गोंडपिपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मुल जाण्यासाठी येनबोडी - पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा, चंद्रपूर व मूल कडून बल्लारशा, गॉडपिपरी, राजुरा जाण्याकरीता पोंभुर्णा - येनबोडी मार्गाचा अवलंब करावा. दिनांक 11/03/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता ते रात्रो 21.00 वाजता पर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने बामणी फाटा बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक, चंद्रपूर पर्यंत अवजड वाहतुक बंद ठेवण्याचे याद्वारे आदेशित करण्यात आले आहे. दरम्यान या दोन्ही कार्यक्रमाची पूर्वतयारी युद्धस्तरावर सुरु असून सुरक्षा यंत्रनेसह विविध समित्या कार्यरत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या