बल्लारपूरच्या पोलीस निरीक्षक पदी श्री आसिफराजा शेख यांची नियुक्ती, तर सुनिल गाडे रामनगर पोलीस स्टेशन मध्ये बदली (Shri Asifaraja Shaikh appointed as Ballarpur Police Inspector, while Sunil Gade appointed as Ramnagar Police Station.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा श्री मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या अधिकारा अंतर्गत जिल्हा बदली आस्थापना मंडळच्या मान्यतेने दि. 07/02/2024 च्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहे यानुसार श्री. आसिफराजा शेख यांची बल्लारपूर च्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी श्री आसिफ राजा शेख यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते बल्लारपूर येथिल पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या बदली मुळे येथील पद रिक्त असल्यामुळे या पदावर श्री आसिफराजा शेख यांची पोलीस निरीक्षक बल्लारपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर श्री सुनिल गाडे यांनी दुय्यम अधिकारी, रामनगर पोलीस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आली आहे सदर बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याची माहिती आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)