चंद्रपूर जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टया जाहीर, जिल्हाधिकाऱ्याचा आदेश (Local holidays announced for Chandrapur district, District Collector's order)
चंद्रपूर : जिल्हाधिकारी विजय गौंडा जी.सी. यांनी आपल्या अधिकारातील सुट्या जाहीर केल्या आहे. या सुट्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महालक्ष्मी (गौरी पूजन) ११ सप्टेंबर, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन १६ ऑक्टोबर आणि नरक चतुर्दशी ३१ ऑक्टोबर या तीन दिवशी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सुटी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्यांसंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये तीन दिवस सुटी असली तरी ही सुटी चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष (बँका) यांना लागू नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या व्यक्तिरिक्त अन्य सुट्यांही राहणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या